पोलीस भरतीसाठी 25 हजाराची लाच मागणाऱ्या पुणे जिल्हा हॅन्डबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पोलीस भरतीच्या उमेदवाराला 25 हजारांची लाच मागणाऱ्या हॉन्डबॉल संघटनेच्या दोघांवर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र हॅन्डबॉल संघटनेचा पदाधिकारी रुपेश मोरे आणि पुणे जिल्हा हॅन्डबॉल संघटनेचा पदाधिकारी राजेश गराडे यांच्यावर 25 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश उत्तम मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रारदार यांनी 2017 मध्ये राज्यस्तरीय हॅन्डबॉल खेळामध्ये सहभाग घेतला होता. त्यांना पोलीस दलात भरती होण्यासाठी त्यांनी खेळाडू प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यासाठी त्यांच्याकडे असलेले राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र क्रीडा व युवा सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे येथी उपसंचालकांकडून पडताळणी करून हवे होते. त्यासाठी राजेश गारडे आणि रुपेश मोरे यांनी तक्रारदार यांना 35 ते 40 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तडजोडीमध्ये 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने 21 सप्टेंबर 2019 रोजी पडताळणी केली. महाराष्ट्र हॅन्डबॉल संघटनेचा उपाध्यक्ष असलेल्या रुपेश मोरे याने प्रमाणपत्राची पडताळणी करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच 23 सप्टेंबर 2019 रोजी केलेल्या पडताळीमध्ये पुणे जिल्हा हॅन्डबॉल संघटनेचा पदाधिकारी राजेश गराडे प्रमाणपत्राची पडताळी साठी 25 हजार रुपये रुपेश मोरे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

पुणे लाचलुचपत विभागाने रुपेश मोरे आणि राजेश गराडे यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून रुपेश मोरे याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like