25000 कोटींच्या घोटाळयाप्रकरणी ‘सेना-भाजप’, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या 50 बडया नेत्यांवर FIR, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळयाप्रकरणी पाच दिवसांत एफआयआर नोंदवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने गुरुवारी (दि.२१) पोलिसांना दिले होते. त्यानुसार बँकेच्या संचालक मंडळावर असलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडळसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह ५० नेत्यांवर आज मुंबईतील एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या नेत्यांवर या घोटाळ्याचा आरोप करणारी याचिका सुरिंदर अरोरा यांनी दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण ?
राज्याची शिखर बँक म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची स्थापना १९६१ मध्ये झाली. बँकेच्या संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी काही सूत गिरणी आणि साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपयांची कर्जे वाटली. या कर्जाची वेळेवर परतफेड न झाल्याने बँकेचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊन बँक डबघाईला गेली. या संचालक मंडळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणी सुरींदर अरोरा यांनी २०१५ मध्ये तक्रार दाखल करत हायकोर्टात अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

संचालक मंडळातील सर्वपक्षीय नेते
अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, माणिकराव पाटील, निलेश बाळासाहेब नाईक, दिलीपराव देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, अमरसिंह पंडीत, सदाशिव मंडलीक, यशवंतराव मंडलीक, यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे, तानाजी चोरगे, मिनाक्षी पाटील, पृथ्वीराज देशमुख, आनंदराव अडसूळ, संतोषकुमार कोरपे, जयंत पाटील, देवीदास पिंगळे, जयवंतराव आवळे, कै. पांडुरंग फुंडकर, ईश्वरलाल जैन, राजन तेली, अमरसिंह पंडीत, शेखर निकम, गंगाधर कुंटुरकर.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश आहे. अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या दिलीपराव देशमुख यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे आनंदराव अडसुळ तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अन्य जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –