पुणे : बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्यांवर आळंदीत FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बैलगाडा शर्यती आयोजित करणाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना खेड तालुक्यातील मरकळ येथे बैलगाडा शर्यतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत आयोजित करणाऱ्यां आयोजकांवर आळंदी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पप्पू हरिभाऊ लोखंडे, अजित भुसे, भाऊ भुसे (सर्व रा़ मरकळ, ता. खेड, जि़ पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकरणी पोलीस काँस्टेबल नवनाथ कारभारी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मरकळ गावातील मरळक -कोयाळी रोडव्रील आराध्य हॉटेल पाठीमागे फॉरेस्ट जंगलात बैलगाडा शर्यतीचा घाट आहे. या घाटावर शनिवारी सकाळी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. याबाबतचा अंतिम निकाल ७ मे २०१४ रोजी दिला होता. हा आदेश डावलला. त्यांनी जाणीव पूर्वक बैलगाडा शर्यतीचे आयोजन करुन प्राण्याना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तामिळनाडुमधील जलकुट्टी खेळावरही बैलगाडा शर्यतीप्रमाणे बंदी घालण्यात आली होती. मात्र, तामिळनाडु सरकारने जलकुट्टी खेळावरील बंदी उठविली आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपाने अनेकदा राजकारण केले पण अजूनही ही बंदी उठविण्यात येऊ शकली नाही.

Visit : Policenama.com