कन्हैयाची एम्सच्या डॉक्टरांना मारहाण

पटना: वृत्तसंस्था

 

पटना येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्हैया आणि त्याच्या समर्थकांनी कनिष्ठ डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप एम्स प्रशासनाने केला आहे.
[amazon_link asins=’B075T1YTR9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7fd79f26-d092-11e8-8a6c-9f90f954a630′]

एआयएसएफ या विद्यार्थी संघटनेचा महासचिव सुशील कुमार एम्समध्ये उपचार घेत आहे. कन्हैया कुमार रविवारी त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात आला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे समर्थकही होते. हे सर्वजण सुशील कुमारला भेटण्यासाठी रुग्णालयात जबरदस्ती घुसू लागले. त्यामुळे कनिष्ठ डॉक्टर आणि त्यांच्यात वाद झाले आणि त्यातून त्यांच्यात हाणामारी झाली, असं एम्स प्रशासनाचं म्हणणं आहे. या घटनेनंतर सर्व कनिष्ठ डॉक्टरांनी रविवारी रुग्णालयात आंदोलन पुकारत या घटनेचा निषेध नोंदवला. कन्हैया कुमारविरोधात गुन्हा दाखल होण्यासाठी या डॉक्टरांनी आजही कामबंद आंदोलन केलं. त्यामुळे अखेर फुलवारी पोलीस ठाण्यात कन्हैया,सुशील कुमारसह त्यांच्या ८० समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी

भिवंडी : भिवंडी शहरातील कामतघर येथील हनुमान नगर परिसरात मौर्या किराणा दुकानामध्ये झालेल्या किरकोळ वादातून दुकानदारासह कुटुंबाला मारहाण करीत दुकानाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. मारहाणीचा हा व्हिडिओ एका स्थानिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. शहरातील कामतघर येथील हनुमान नगर परिसरात दिनेश मौर्या यांचं किराणा दुकान आहे. सकाळच्या सुमारास एका ग्राहकाने दहा रुपयाचे पाव मागितले दुकानदाराने ग्राहकाला दहा रुपयाचे पाच पाव दिले मात्र ग्राहकाने दहा रुपयांमध्ये सहा पावची मागणी केली. दुकानदाराने 6 पाव न दिल्याने दुकानदार आणि ग्राहकामध्ये बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली. काही वेळानंतर त्या ग्राहकाने आपल्यासोबत त्याचा मोठ्या भावासह कुटुंब आणि इतर साथीदार दुकानात पोहोचून दुकानदाराला मारहाण करायला सुरुवात केली. बचाव करण्यासाठी आलेल्या दुकानदाराच्या कुटुंबीयांना देखील त्यांनी मारहाण केली. दुकानदाराला मारहाण करीत त्यांच्या दुकानाची तोडफोड करण्यात आलीये. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असूव व्हिडिओ व्हायरल झालाय.