तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाविरोधात माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांचा मुलगा हरवला असून त्याच्या तपासाबाबत चौकशी करण्यासाठी ते पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव यांनी तक्रारदार गणेश जलगावकर (वय-55, रा. माहीम कॉजवे) यांना कानाखाली मारून त्यांचे डोके टेबलावर आपटले. त्यामुळे जलगावकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांनी तक्रार दिली असून सातव फरार झाले आहेत.

गणेश जलगावकर यांच्या इमारतीतील नदीम शेख यांची दोन मुले गुरुवार पासून बेपत्ता झाली. त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नसल्याने त्यांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेपत्ता मुलांचा शोध सुरु केला होता. मात्र, पोलिसांना देखील मुले सापडली नाही. ही बाब जलगावकर यांना समजल्यानंतर ते शेख आणि त्यांचा भाऊ या दोघानां घेऊन माहिम पोलीस ठाण्यात मध्यरात्री दोनच्या सुमारास गेले होते.

पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव यांच्याकडे बेपत्ता असलेल्या मुलांच्या तपासाबाबत चौकशी केली असता सातव यांनी मारहाण करीत त्यांचे डोके टेबलावर आपटले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्यानंतर सातव यांनी जलगावकर यांना लॉकपमध्ये टाकून त्यांची कोऱ्या कागदावर सही घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जलगावकर यांनी सही केली नाही. त्यामुळे सातव यांनी जलगावकर यांना पुन्हा मारहाण केली. या घटनेची माहिती जलगावकर यांनी माहिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गडांकुश यांना दिली. जलगावकर यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक सातव यांच्यावर 353, 309, 504, 506 महाराष्ट्र पोलीस कायदा 120(ब), 112 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like