सैफ अली खानच्या ‘तांडव’ सिरीजच्या अडचणीत वाढ ! डायरेक्टर अली अब्बास जफर विरोधात लखनऊमध्ये FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि ॲक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) ही वेब सीरिज अडचणीत सापडली आहे. वेबी सीरिजचे डायेरक्टर अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे यांच्याविरोधात लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

या सीरिजवर देवी देवतांचा अपमान करण्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. समाजातील विविध वर्गांमध्ये द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली निर्माता, डायरेक्टर लेखक आणि इतर लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

तांडव सीरिजसाठी ॲमेझॉनच्या अपर्णा पुरोहित, डायरेक्टर अली अब्बास जफर, प्रोड्युसर हिमांशु आणि लेखक गौरव सोलंकी यांच्यासह काही अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं बजावलं होतं समन्स
तांडवबद्दल समोर येणाऱ्या तक्रारी पाहता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं रविवारी ॲमेझॉन प्राईम व्हिडीओला या मुद्द्यावर स्पष्टीकरण मागितलं होतं. सोशल मीडियावर याला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात होती.

सैफ अली खाान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांवड (Tandav) या सीरिजचं पोस्टर 16 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी (वार शुक्रवार) रिलीज झाली आहे. परंतु लगेचच सोशल मीडिायावर याला विरोध होताना दिसत आहे.

मिर्झापूर विरोधात तक्रार दाखल
तांडव व्यतिरीक्त ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ वरील वेब सीरिज मिर्झापूर विरोधात देखील हजरतगंज ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या सीरिजचा दुसरा सीजन ऑक्टोबर 2020 मध्ये रिलीज करण्यात आला होता.

मिर्झापूरसाठी रितेश सिंधवानी, फरहान अख्तर, भौमिक गोंडलिया आणि ॲमेझॉनवर आयपीसी मधील कलम 295 ए, 504, 505, 34 आणि आयटी ॲक्ट 2008 मधील कलम 67 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.