बलात्कार प्रकरणी तडजोड भोवली ; पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकावर गुन्हा दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

बलात्कारा सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उशिरा दाखल केला तसेच बलात्कारातील आरोपी आणि फिर्यादीमध्ये तडजोड करून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापूर पोलिस आयुक्‍तालयातील जेलरोड पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरूध्द बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हयाचा तपास महिला सहाय्यक आयुक्‍त करीत आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b51205a-cd69-11e8-9682-858112a92820′]

तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष श्रीमंधर काणे (नेमणुक : सुरक्षा शाखा, सोलापूर शहर) आणि तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र बाबुराव राठोड (नेमणुक ः अक्‍कलकोट दक्षिण पोलिस ठाणे, सोलापूर ग्रामीण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम संभाजी अंभगराव यांनी फिर्याद दिली असुन आरोपींविरूध्द भादवि 166 अ(क) सह बाल लैंगिक अत्याचार (प्रतिबंधक) सन 2012 चे कलम 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा दि. 22 फेबु्रवारी 2016 रोजी घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलीसोबत झालेल्या अत्याचाराबाबत पोलिस ठाण्यास माहिती मिळाल्यानंतर तसेच सोलापूर शहर नियंत्रण कक्षाने रात्रगस्तीच्या महिला अधिकार्‍यांना कळविले होते. संबंधित महिला अधिकार्‍याने रूग्णालयात जावुन माहिती घेतली आणि पुढील कारवाई करण्यासाठी पोलिस ठाण्यात सांगितले. त्यावेळी आरोपी तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष काणे आणि सहाय्यक निरीक्षक देवेंद्र राठोड यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला नाही.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92117e06-cd69-11e8-987f-bbc0c93b4729′]

बलात्कारा सारख्या गुन्हयातील आरोपी व फिर्यादी यांच्यात तडजोड घडवुन आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तडजोड न झाल्याने नंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दि. 31 जानेवारी 2018 रोजी सोलापूर येथील अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश वाय.जी. देशमुख यांनी जजमेंटमधील दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने पोलिस उपायुक्‍तांनी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यावरून आरोपींविरूध्द बुधवारी (दि. 10 ऑक्टोबर) रात्री जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास महिला सहाय्यक आयुक्‍त दिपाली काळे करीत आहेत.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9756acc9-cd69-11e8-81bd-cbff2c4043a2′]

यासंदर्भातील अहवाल सोलापूरचे पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयास दिला आहे. याबाबत सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांना देखील कळविण्यात आले आहे.