हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी बंगाली अभिनेत्री सायानी घोषविरोधात FIR

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बंगाली अभिनेत्री सायानीने ट्वीटरद्वारे एक मीम शेअर केला होता. त्या मीमद्वारे तिने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भाजप नेते आणि मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी बंगाली अभिनेत्री सायानी घोषविरोधात फिर्याद दिली आहे. रॉय यांनी अभिनेत्री सायानीविरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

बंगाली अभिनेत्रीने या आरोपावर आपली बाजू मांडताना सांगितले आहे की, हे मीम आताचे नसून ते फेब्रुवारी २०१५ चे आहे. आणि ते मीम मी पोस्ट केले नसून ट्विटर अकाउंट हॅक केले होते. त्याने ते ट्वीट केले होते. रॉय यांनी सायानी घोषवर आरोप करत ट्विट केले आहे. की, तुम्ही IPC. कलम २९५ अ अन्वये कायद्याचे उल्लंघन केले आहे, आता त्याचे दुष्परिणाम भोगण्यास तयार राहा. तर रॉय यांनी दुसऱ्या ट्वीट केले आहे की, तुमच्याविरोधात कोलकातामध्ये FIR दाखल झाला आहे. गुवाहाटीच्या एका तरुणाने मला सांगितले त्याच्या धार्मिक भावना मीममुळे दुखावल्या गेल्या आहेत. आणि तो देखील FIR दाखल करणार आहे. मला खात्री आहे की, आसाम पोलीसया प्रकरणावर लक्ष घालेल आणि रिमांडसाठी विचारणा करेल.

भाजप नेते रॉय यांनी असे देखील सांगितले की, अजून एका व्यक्तीने सायानीच्या विरोधात बंगळुरूमध्येही FIR नोंद केला आहे. तसेच बंगाली अभिनेत्री सायानीने या पूर्ण प्रकरणी आपली बाजू मांडताना सांगितले की, माझ्या प्रिय मित्रांनो, २०१५ सालच्या माझ्या ट्वीट लक्ष वेधले असून हे खूपच आपत्तीजनक आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगते की, २०१० साली मी ट्विटर जॉईन केले. काही दिवसांनी मला त्यात रस नसल्याने ते अकाउंट फक्त होते. नंतर मला कळले की, माझं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. असे घोष यांनी याबाबत सांगितले.