दिल्लीतील ‘त्या’ इमारतीत आज पुन्हा आग

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्लीतील ज्या इमारतीला रविवारी पहाटे आग लागून ४३ जणांचा मृत्यु झाला होता. त्याच इमारतीला सोमवारी सकाळी पुन्हा आग लागली आहे.

नवी दिल्लीतील राणी झाशी रोडवरील एका चार मजली इमारतीला आग लागून त्यात ४३ जणांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी फॅक्टरीचा मालक रेहान याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या घटनेतील २९ जणांच्या मृतदेहांची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली होती.

कालच्या घटनेनंतर आज सकाळी पुन्हा याच इमारतीत आग लागली असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अतिशय चिंचोळ्या गल्ल्यांमुळे आग विझविण्यास जवानांना अडचणी येत आहे.

Visit : Policenama.com

You might also like