Fire at CBI office । दिल्लीतील CBI मुख्यालयाला आग; अधिकारी बाहेर पळाले, 5 अग्निशमन गाड्या दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Fire at CBI office । वी दिल्लीमधील (New Delhi) लोधी रोडवर असलेल्या CBI मुख्यालयाला आज गुरुवारी सकाळच्या सुमारास आग लागली. ही आग पार्किंग एरियातील इलेक्ट्रॉनिक रूम लागल्याची माहिती समोर आलीय. आग लागल्यानंतर काही वेळात भीषण आगीचे (Fierce fire) लोळ बाहेर येताना दिसले. आग लागल्याचं समजताच सर्व अधिकारी बाहेर आले. अग्निशामक दलाच्या (Fire brigade) 5 गाड्यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणली आहे. सध्या तिथं कुलिंगचं काम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. Fire at CBI office । fire cbi headquarters delhi officers run outside building

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. तर, सीबीआयच्या (CBI) या मुख्यालयामध्ये महत्वाचे अनेक कागदपत्र असतात. यामुळे या आगीतून काय नुकसान झाले, त्याच्या मागचे कारण काय आदी गोष्टी देखील समोर येणे गरजेचे आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार इमारतीच्या पार्किंगसाईटमध्ये ही आग लागल्याचे समजते आहे. म्हणून इमारतीमध्ये देखील धूर पसरला आहे. यावरून आता अधिकाऱ्यांनी धूर पाहून इमारतीबाहेर बचावासाठी बाहेर धाव घेतली आहे. भीषण आगीमुळे मुख्यालयातील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

Web Title : Fire at CBI office । fire cbi headquarters delhi officers run outside building

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील नामांकित हॉस्पीटलमधील 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम व बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावून शूटिंग?

Gail Recruitment-2021 | इंजिनिअर, MBA, वकील, BA पदवीधरांसाठी ‘गेल’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! जाणून घ्या

Kolhapur Crime News | आईचा खून करून काळीज भाजून खाण्याचा प्रयत्न; नराधम मुलाला फाशीची शिक्षा