वाघोली भागातील कंपनीला भीषण आग…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली भागातील एका कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

वाघोली भागातील लाईफ लाईन रुग्णालयाजवळ गणराज इंटरप्रायझेस सर्व्हे न. 647 ही कंपनी आहे. येथे नट-बोल्ट व स्क्रू बनवले जातात. प्रोडक्शन बनविण्यासाठी ऑइल लागते. त्यामुळे ऑईल साठविलेले होते. अचानक रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास येथून धूर येत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी ही माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाला दिली. त्यांनतर जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. ऑईलमुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली होती.

ओंकार इंगवले फायरमन- प्रसाद जीवडे, पंकज माळी, महेश घटमाळ, विशाल घोडे यांनी ही कामगिरी केली.