कुरकुंभ एमआयडीसीमध्ये भीषण आग, गावे रिकामी करण्यास सुरुवात ; आमदार राहुल कुल घटनास्थळी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली असून यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. अगोदर अल्कली या कंपनीला आग लागून नंतर ही आग दुसऱ्या कंपनीला लागल्याने आगीने उग्ररूप धारण केले आहे. कुरकुंभ येथे केमिकल कंपन्या असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकत चालली असून जवळपासच्या गावांतील नागरिक घरे सोडून जात आहेत. आगीचा भीषण आगडोंब उसळत असून

गावे खाली करण्यात येत आहेत. दौंड चे आमदार राहुल कुल यांना ही बाब समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून संबंधित विभागांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –