गुजरात : रुग्णालय आगीतील मृतांच्या कुटुंबीयांसाठी पंतप्रधानांचा मदतीचा हात

पोलिसनामा ऑनलाईन – गुजरातमधील अहमदाबादमध्ये कोविड सेंटरला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, शहरातील नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकार्‍यांकडून देण्यात आली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीमधून 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.

आगीच्या घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाखांची मदत जाहीर केली आहेत. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीदेखील या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) संगीता सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जणांना यातून वाचवण्यात आले आहे. सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like