अहमदनगर : बालिकाश्रम रस्त्यावरील फर्निचर दुकानाला आग, लाखो रुपयांचे नुकसान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बालिकाश्रम रस्त्यावरील न्यू स्टाइल फर्निचर दुकानाला रात्री भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडे मळा परिसरात हॉटेल गजराज शेजारी न्यू स्टाइल फर्निचर नावाचे दुकान आहे. काही महिन्यांपूर्वीचे दुकान सुरू झालेले आहे. रात्रीच्या वेळी अचानक दुकानाला आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ही आग शॉर्टसर्किटमुळे झाली की कोणी लावली, याबाबत संभ्रम आहे.

आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब व तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फर्निचर दुकान असल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यात दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Visit : Policenama.com