गुजरातमध्ये आगीनंतर भीषण स्फोट, आकाशात दिसले आगीचे गोळे (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊन काळात बंद असलेल्या प्लॅन्ट पूर्वपदावर येत असताना अनेक दुर्घटना घडत आहेत अशीच एक घटना गुजरातमधील ओएनजीसी प्रकल्पात घडली आहे. गुजरातच्या सूरत इथल्या तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन मध्ये काल रात्री उशिरा अचानक आग लागली.

आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आगीचे लोळ दिसायला लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या प्लॅन्टमध्ये किती लोक काम करत होते? कोणती जीवितहानी झाली की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. . हा प्लान्ट स्वयंचलित असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान स्फोटानंतर 4 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की आगीचे मोठे गोळे दिसत आहेत. त्यावरून ही आग किती मोठी असेल याची कल्पना आपण करू शकता. याआधी याच प्लॅन्टमध्ये 2015 रोजी देखील आग लागली होती. या आगीत 15 जणांचा होरपळून त्यावेळी मृत्यू झाला होता. आता ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नाही. आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ दिसत आहेत. आग लागल्यानंतर प्लान्टमधील 4 जण बेपत्ता झाले असून सध्या त्यांचा शोध सुरू आहे.