पिरंगुट येथील किराणा दुकानाला भीषण ‘आग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिरंगुट येथील घोटावडे फाटाजवळ असलेल्या दुकानांना पहाटे ४ वाजता भीषण आग लागली. पीएमआरडीएच्या बंम्बांनी तातडीने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती शेजारील गॅस सिलेंडरचे दुकान व हॉस्पिटलला त्याची झळ पोहचली नाही.

पिरंगुट येथील घोटावडे फाटा येथील किराणा दुकानाला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सर्वप्रथम आग लागली. किरकोळ सामान असल्याने ही आग वेगाने पसरत शेजारील हार्डवेअरच्या दुकानात पसरली. आगीची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. उप अग्निशमन अधिकारी विजय महाजन, राहुल शिरोळे, वैभव कोरडे, प्रशांत अडसूळ, सुरज इंगवले, निखिल फरांदे, संदीप तांबे या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न केले.

या हार्डवेअरच्या दुकानाशेजारीच गॅस वितरणाचे दुकान आहे. त्यात गॅस सिलेंडर होते. तसेच त्याच्या शेजारी हॉस्पिटलही आहे. या ठिकाणी आग पोहचल्यास मोठी हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्मचाºयांनी सर्व प्रथम आगीवर नियंत्रण मिळविण्याबरोबर या दुकानात आग पसरणार नाही, याची काळजी घेतली. आग इतकी मोठी होती की त्यात दोन्ही दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like