दिल्लीत ‘बुट’ बनवण्याच्या कारखान्याला भीषण ‘आग’ ! ‘अग्निशमन’दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत आग लागण्याचा घटना थांबत नाहीयेत, दिल्लीत आज पुन्हा एक भीषण आग लागण्याची घटना घडली. दिल्लीत मायापुरी फेज 2 च्या हरिनगर भागात एक बुट बनवण्याच्या कारखान्याला शनिवारी भीषण आग लागली आहे.

आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेतली आहे, सध्या अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु आगीचे लोट जास्त असल्याने परिसरात देखील तणाव वाढला आहे.

या आगीच्या भीषण घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आली नाही.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/