दिल्लीच्या पटपडगंज भागात ‘भीषण’ आग, एकाचा मृत्यु

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील पटपडगंज भागातील औद्योगिक परिसरात गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. त्यात एका जणाचा मृत्यु झाला आहे. ही आग विझविण्यासाठी दिल्ली अग्निशामन दलाचे तब्बल ३२ बॅाम्ब पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.दिल्लीतील पटपडगंज परिसरातील औद्योगिक भागातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पहाटे २ वाजून ३८ मिनिटांनी आग लागली होती.

सुरुवातीला दिल्ली अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी आग विझविण्याचे काम करीत होत्या. मात्र, काही वेळातच आगीने रौद स्वरुप धारण केले. त्यामुळे अग्निशामक दलाच्या दिल्लीतील विविध भागातील गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. छोटे औद्योगिक कारखाने असलेल्या या इमारतीला आग लागली असून त्यात एकाचा मृत्यु झाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे.

अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेली आग विझविण्यास अग्निशामक दलाला सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पूर्णपणे यश आले नव्हते. आता आगीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. आग पूर्णपणे विझविल्यानंतरच आगीचे नेमके कारण समजू शकेल, असे दिल्ली अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/