बॉम्बे टॉकीज जवळ असणाऱ्या गोदामात आग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

मालाड वेस्ट येथील बॉम्बे टॉकीज जवळ असणाऱ्या एका लाकडी गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या गोदामाला आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील मालाड वेस्ट येथील सोमवार बाजार परिसरातील बॉम्बे टॉकीज जवळ असणाऱ्या एका लाकडी गोदामाला आज सकाळी ११ वाजता भीषण आग लागली. आग लागलेले हे गोदाम लाकडी वस्तुंनी भरले असल्यामुळे आग अगदी कमी वेळात जास्त प्रमाणात पसरली. सुरुवातीला गोदामातील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे प्रमाण जास्तच पसरल्याने गोदामातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क करुन या घटने संदर्भात माहिती दिली.

या आगीची बातमी कळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवळपास १२ गाड्या दाखल झाले. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत . दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या शेजारीच ऐतिहासिक बॉंबे टॉकीज स्टुडिओची इमारत आहे.

फ्लिपकार्ट वरुन त्यांनी मागविला खुनासाठी चाकू

विशेष म्हणजे हा रहिवासी आणि व्यावसायिक परिसर आहे. इथे लाकडी वस्तूंची अनेक दुकाने आहेत. त्यामुळे आग पसरु नये यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु आगीनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आहेत. शिवाय अग्निशमन दल आणि अॅम्ब्युलन्स वगळता, इथे दुसऱ्या कोणत्याही वाहनाला परवानगी दिल्याजात नाहीये. रिक्षा आणि बस या वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे.

दरम्यान, ९० टक्के आगीवर नियंत्रण मिळवले असून आगीत जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती मालाडमधील काँग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी माध्यमांना दिली.

स्टेज कोसळून अनेक गोविंदा जखमी

[amazon_link asins=’B07417987C,B00L8PEEAI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c34d5e0-b010-11e8-a30b-ffac63e02003′]