INS विशाखापट्टणमवर लागलेल्या आगीत १ ठार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माझगाव डॉकयार्डमध्ये लावलेल्या आयएनएस विशाखापट्टण या युद्धनौकेवर लागलेल्या भीषण आगीत एक कर्मचारी ठार झाला. अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे.

माझगाव डॉकयार्डमध्ये मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या आय़एनएस विशाखापट्टनमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डेकवर आग लागली.सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही आग लागली. त्यात एकजण डेकवर अडकला होता. तर महानगरपालिका आणि नौदलाच्या अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आयएनएस विशाखा पट्टणम ही युद्धनौका सध्या समुद्री चाचणी अंतर्गत आहे. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. युद्ध नौकेवर अडकलेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची