अग्नीशमन दलाच्या चालकास सक्तमजुरी

सांगली:पोलीसनामा ऑनलाईन 

अग्नीशमन दलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चालक अशोक शंकर निकम (56, रा. शामरावनगर) याला 18 महिने सक्तमजुरी व सात हजार दंडाची शिक्षा झाली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. जवळगेकर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे एस. एम. पखाली व जे. एस. डाके यांनी काम पाहिले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c0a4d0d-c270-11e8-856c-97fa9ed29da6′]

अधिक माहिती अशी, की 24 सप्टेंबर 2015 रोजी दुपारी बाराच्या सुमारास डॉ. सुहास नारायण देशपांडे व त्यांची मुलगी मृदुला हे दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी मागून येणाऱ्या अग्नीशमन दलाच्या गाडीने जोराची धडक दिली. त्यात डॉ. देशपांडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मृदुला गंभीर जखमी झाल्या.

मुलगा झाल्याच्या आनंदात पैसे वाटप सुरू असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक
याप्रकरणी चालक अशोक निकम याच्याविरोद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी तपास करून दोषारोपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. हवालदार संदीप मोरे यांचीही मदत झाली. त्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली.