फातिमा सना शेखच्या घरी लागली आग, फायर ब्रिगेडनं हाताळली परिस्थिती ! अभिनेत्रीनं ‘असे’ मानले आभार

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची ‘दंगल गर्ल’ बनून पदार्पण करणारी दंग फेम अ‍ॅक्ट्रेस फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिच्या मुंबईतील घरी आग लागली होती. ही आग जास्त पसरलेली नव्हती. फातिमानं गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) मध्यरात्री सोशलवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

फातिमानं तिच्या इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली होती. यात तिनं लिहिलं की, आता माझ्या घरी आग लागली होती. घाबरत घाबरत मी लगेच फायर डिपार्टमेंटला फोन केला आणि काही वेळातच ते माझ्या घरी आले आणि परिस्थिती हाताळली. थँक यू सो मच मुंबई फायर ब्रिगेड असं म्हणत फायर ब्रिगेडचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये तिनं मुबई फायर ब्रिगेडला टॅगही केलं आहे

फातिमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तिचा लुडो हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. अनुराग बासुनं हा सिनेमा डायरेक्ट केला होता. सिनेमात फातिमा सोबत पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अभिषेक बच्चन, सान्या मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर आणि आशा नेगी हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. काही दिवसांपर्वीच ती सूरज पर मंगल भारी सिनेमात दिसली आहे. लॉकडाउननंतर सिनेमा हॉलमध्ये रिलीज होणारा हा पहिला सिनेमा होता.