नौसेनेच्या ‘मिग २९ के’ विमानाची ड्रॉप टॅंक कोसळून आग

वॉस्को : वृत्तसंस्था – विमानतळाच्या धावपट्टीवरून कवायतीसाठी उड्डाण केलेल्या नौदलाच्या मीग २९ के लढाऊ विमानाचा ड्रॉप टॅंक कोसळून धावपट्टीवर कोसळल्याने धावपट्टीवर आग लागल्याची घटना गोव्याच्या दाबोळी विमानतळावर घडली. त्यामुळे काही काळासाठी विमानतळावरील वाहतुक मुंबई आणि बंगळूरू विमानतळावर वळविण्यात आली आहेत.

भारतीय नौदलाच्या गोवा विभाच्या विमानांची कवायत सुरु होती. त्यावेळी आज दुपारी बाराच्या सुमारास मिग २९ के या लढाऊ विमानाने धावपट्टीवरून उड्डण केले. त्यानंतर विमानाच्या ड्रॉप टॅंकचा भाग अचानक कोसळला. त्यानंतर त्यात तेल असल्याने भयंकर स्फोट होऊन आग लागली.

आग लागल्यानंतर परिसरात प्रचंड धूर पसरला होता. त्यामुळ परिसरातही घबराट पसरली होती. त्यानंतर दाबोळी विमानतळ प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी व सुरक्षा यंत्रणांनी धाव घेतली. त्यानंतर आग विझवण्यात आली. त्यानंतर धावपट्टीवर प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे विमानांची वाहतुक वळविण्यात आली होती. तर विमानतळावरील सहा विमाने सुरक्षित स्थळी हलविण्यात आली. विमानातीच टाकी कशी कोसळली. याची माहिती नौदलाचे अधिकारीच देऊ शकतील असे सांगण्यात आले. तर पावणेचार पर्यंत येथील विमान वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.

काय आहे ड्रॉप टॅंक ?

एअर फोर्सच्या विमानात ड्रॉप टॅंक हा विमानाचा एक भाग असतो. लढाऊ विमानाचा हा एक्सटर्नल पार्ट आहे. या टॅंकला काढता येऊ शकते. विमानाच्या युध्दात या ड्रॉप टॅंकचा वापर विमानाच्या इंधनाची क्षमता वाढविण्यासाठी केला जातो. ही टॅंक गरजेच्या वेळी काढून टाकता येते.

तसेच लावताही येते. विमानाला इंधनाची अतिरिक्त गरज पुर्ण करण्यासाठी या ड्रॉप टॅंकचा वापर केला जातो. विमानाच्या मुख्य टाकीतील इंधन संपल्यावर तसेच विमानाला अतिरिक्त उर्जेची गरज असल्यास या ड्रॉप टॅंकचा उपयोग होतो.