कुंभमेळ्यात पुन्हा अग्नितांडव  ; राज्यपाल थोडक्यात बचावले

प्रयागराज : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पुन्हा आग लागली आहे. या आगीमध्ये बिहारचे राज्यपाल लालजी टंडन थोडक्यात बचावले आहे. कुंभमेळ्यात आग लागल्याची ही आतापर्यंतची पाचवी घटना आहे.

बुधवारी पहाटे अडीच वाजता सेक्टर-२० च्या अरैल भागात असलेल्या त्रिवेणी टेंट सिटीमध्ये आगीची घटना घडली. या तंबू मध्ये बिहारचे राज्यपाल लालजी टंडनही यावेळी या कॅम्पमध्ये वास्‍तव्यास होते. ज्यावेळी आग लागली तेव्हा बिहारचे राज्यपाल लालजी टंडन झोपेत होते. आग लागल्यानंतर टंडन यांनी लगेच सर्किट हाऊसमध्ये पलायन केले. या आगीमध्ये टंडन यांचा मोबाइल, चश्मा, घड्याळ आणि अन्य सामान जळून खाक झाले आहे.

कुंभमेळा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत मोठी यात्रा आहे. देशभरातून लाखो भाविक या कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे पोहोचले आहेत. त्‍यांच्या राहण्यासाठी तेथे अनेक तंबू उभारण्यात आले आहेत. परंतु, गेल्‍या काही दिवसांपासून तंबू उभारलेल्‍या परिसरात आगी लागण्याच्या अनेक घटना घडल्‍या आहेत. कुंभमेळ्यात आगीची घटना यापूर्वीही पाच वेळा घडली आहे. यापूर्वी गोरखनाथ संप्रदायच्या शिबिरातही लागलेल्या आगीत दोन तंबू जळाले होते. त्यापूर्वी १९ जानेवारी रोजी कुंभच्या सेक्टर १३ मध्ये आगीची घटना घडली होती. यामध्येही काही तंबू जळून खाक झाले होते.