धक्‍कादायक ! ऑटोमॅटिक गेट लॉक झालं अन् ‘ते’ तिघे अडकले, ‘जिवंत’ जळाला ड्रायव्हर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत एका चालत्या कारालाच आग लागल्याची घटना घडली. आग लागताच कारचे ऑटोमेटिक डोर लॉक झाले. ज्यामुळे कार चालक बाहेर येऊ शकला नाही. त्यामुळे या अपघातात कार चालक जिवंत जळला गेला. हा भीषण अपघात गुरुवारी रात्री घडला.

ऑटोमैटिक गेट लॉक होते ही कार में फंसे 3 लोग, ज‍िंदा जला ड्राइवर

दिल्लीच्या मुकरबा चौकमध्ये गुरुवारी रात्री एका चालत्या एक्सयूव्ही कारला अचानक आग लागली. आग लागल्याने कारचे ऑटोमेटिक डोअर लॉक झाले. यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ पसली. हे डोअर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र या कारमध्ये बसलेले तीन लोक काहीही करु शकले नाही.
ही कार काश्मीरी गेट बस स्टेशनकडून रोहिणीच्या दिशेने जात होती. याच दरम्यान रात्री १०.४० वाजता कारला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आगने संपूर्ण कारला विळख्यात घेतले.

ऑटोमैटिक गेट लॉक होते ही कार में फंसे 3 लोग, ज‍िंदा जला ड्राइवर

या घटनेची माहिती तात्काळ अग्नीशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्नीशमनच्या २ गाड्या तेथे तात्काळ पोहोचल्या. त्यांनी आग नियंत्रणात आणली. परंतू तोपर्यंत ड्रायवरचा गाडीतच मृत्यू झाला.

ऑटोमैटिक गेट लॉक होते ही कार में फंसे 3 लोग, ज‍िंदा जला ड्राइवर

या आपघातात ड्रायव्हरचा मृत्यू झाला तर त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले. या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग कारमध्ये शार्ट सर्किट झाल्याने लागल्याची शक्यता वर्तवली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –