पुणे पोलिस आयुक्‍तालयात पुन्हा आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पोलिस आयुक्‍तालयातील एफआरओ विभागाजवळील विद्युत वाहक खोलीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लागलेल्या आगीमुळे पोलिस अधिकार्‍यांची धावपळ उडाली. काही दिवसांपुर्वी पोलिस आयुक्‍तालयात असलेल्या ट्रान्सफार्मला आग लागल्याने पोलिसांची धावपळ झाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c878079e-cba2-11e8-9263-971f47d75e6f’]

एफआरओ विभागात प्रवेश करण्यासाठी जो आयुक्‍तालयातच्या गुन्हे शाखेतुन रस्ता जातो तेथे विद्युत वाहक खोली आहे. तेथे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. आग ही अतिशय किरकोळ स्वरूपाची होती. लागलेल्या आगीबाबत अग्‍नीशमन दलाला वर्दी देण्यात आली होती. अग्‍नीशमन दलाचे जवान काही वेळातच घटनास्थळी पोहचले. मात्र, पोलिस आयुक्‍तालयात एफआरओ विभागाजवळ आग लागल्याची माहिती समाज माध्यमांवर येताच प्रचंड खळबळ उडाली.

अग्‍नीशमन दलाचे जवान आणि पोलिस कर्मचारी यांनी आग काही क्षणातच विझवली. आगीमध्ये कुठलेही मोठे नुकसान झालेले नाही. मात्र, वेळावेळी लागत असलेल्या आगीमध्ये कामाचा खेळंबा होत असल्याची प्रतिक्रिया काही पोलिस कर्मचार्‍यांनी पोलीसनामाशी बोलताना दिली आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास कामाचा खोळंबा झाला. अग्‍नीशमन दलाची गाडी थेट आयुक्‍तालयात आल्यामुळे इतर विभागातील कर्मचार्‍यांनी देखील आयुक्‍तालयाच्या मुख्य प्रवेदशव्दारजवळ गर्दी केली होती.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cd42d617-cba2-11e8-a75c-4d42b73233d7′]

सतत होणार्‍या अशा घटनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोलिस कर्मचारी आणि काही अधिकारी करीत आहेत. एफआरओ हो पोलिस आयुक्‍तालयातील अत्यंत महत्वाचा विभाग आहे. परदेशी नागरिकांची नोंदणी त्या विभागात होत असते. परदेशी नागरिकांबाबतच्या सर्व माहितीची नोंदणी तेथे होत असल्याने आणि त्याच विभागाजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1172155-cba2-11e8-ad1e-cdf582a93a6f’]
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील आग ज्या ठिकाणी लागली त्या ठिकाणाची पाहणी केली आहे. ज्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या काळजी घेतली जात नाही. त्यामुळेच आगीची घटना घडली असल्याचे मत काही जणांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. पोलिसांनी वेळीच फायर एक्स्टिंग्युशरचा मारा केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

आग विझविण्यासाठी ताबाेडताेब पारपाेर्ट ब्रांच स्टाफचे पाेलिस उपनिरिक्षक मिलींद कुरकूटे अाणि पी.एन ढापसे यांनी फायर एक्स्टिंग्युशरचा वापर करुन ही आग अाटाेक्यात आणली.