लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वासमोर विद्युत वाहिनीने घेतला पेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 
गणेशोत्सवाचा आजचा तिसरा दिवस आहे. यानिमित्ताने लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याकरिता लाखो भक्त गर्दी करतात. पण लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच असलेल्या गॅस कंपनी लेन मध्ये शॉर्ट सार्केट झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे ऐन गर्दीच्या परिसरात एकाच खळबळ माजली.
[amazon_link asins=’B00MIFIKO8,B00BSE5WQ4,B0085SLDKU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e8abcb6c-b8c9-11e8-b704-c9165421c7b6′]
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , लालबागच्या राजाच्या मंदिर परिसरात जमिनीखाली  विद्युत वाहिनी आहेत यातील एका  विद्युत वाहिनीने पेट घेतला त्यामुळे खळबळ माजली. मात्र याठिकाणी तात्काळ अग्निशामक दलाचे कर्मचारी पोहचले. त्यांनी ताबडतोब कृती करीत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवल्याने पोलिसांची कारवाई

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , बेस्ट कर्मचारीही या ठिकाणी दाखल झाले आहेत. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीखालून गेलेल्या जुन्या केबलने पेट घेतला होता. मात्र अग्निशामकच्या मदतीने तत्काळ आग विझवली. तसेच मुख्य वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.