टिळक रोडवरील इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

टिळक रोडवरील स्टेट बँकेची शाखा असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात बुधवारी सकाळी मोठी आग लागली. त्यात संपूर्ण घरातील सामान जळून खाक झाले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’300131ea-cc4e-11e8-b2be-57ac50ce8867′]

टिळक रोडवरील दुर्वांकुर हॉटेल जवळ स्टेट बँकेची शाखा असलेल्या इमारतीमध्ये तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर अग्रवाल राहतात़ बुधवारी त्यांच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आग लागल्याचे हे लक्षात आल्यावर घरातील सर्व जण बाहेर पळाले. संपूर्ण मजला अग्रवाल यांचा आहे. घरातील साहित्याने पेट घेतल्याने ही आग वेगाने इतर खोल्यांमध्ये पसरली. अग्निशमन दलाला याची माहिती ९ वाजून १३ मिनिटांनी मिळाली. अग्निशामन दलाचे दोन बंब, दोन वॉटर टँकर व एक देवदूत गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घरात धूर कोंडला गेला असल्याने जवानांना आग विझविताना मोठे प्रयास करावे लागले. त्यांनी काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळविले.

नगरचा छिंदम, मुंबईचा कदम ही भाजपची संस्कृती : अशोक चव्हाण

मात्र, तोपर्यंत तिसऱ्या मजल्यावरील सर्व घरगुती सामान जळून खाक झाले होते. वरच्या बाजूला केलेले फॉल सिलिंगही खाली पडले. तिसऱ्या मजल्यावरुन घरातून चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी जिना करण्यात आला आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानाने वेळीच काळजी घेतल्याने ही आग चौथ्या मजल्यावर पोहचली नाही.  मात्र धूरामुळे चौथ्या मजल्यावरील घरातील खोल्या काळ्या ठिक्कर झाल्या आहेत.