AIIMS हॉस्पीटलला आग लागली त्याचवेळी ‘तिनं’ दिला मुलीला जन्म

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयाला अचानक आग लागली, आणि क्षणार्धात ही बातमीसुद्धा वाऱ्यासारखी पसरली कारण याच रुग्णालयामध्ये केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना अ‍ॅडमिट करण्यात आलेले आहे. रुग्णालयातील एका भागाला शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली आणि अग्निशमन दल येईपर्यंत ही आग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचली.

रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आगीचे मोठे मोठे लोळ उठत होते आणि अशातच धोकादायक ठिकाणी असलेल्या रुग्णांना एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात येत होते. मात्र याच वेळी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला कळा सुरु झाल्या. डॉक्टरांनी तिला सुरक्षित ठिकाणी हलवून तिची प्रसूती करण्यात आली. त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. ज्यावेळी त्या मुलीचा जन्म झाला त्यावेळी  अग्निशामक दलाचे कर्मचारी रुग्णालयाबाहेर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

सुदैवाने अरुण जेटली ज्या मजल्यावर उपचारासाठी होते त्या ठिकाणी आग पोहचू शकली नाही. या रुग्णालयाकडे अग्निशामकदलाची एनओसीही नसल्याचे उघड झाले.

 

आरोग्यविषयक वृत्त