जागतिक दबावामुळे ब्राझीलला ‘जाग’, आग विझवण्यासाठी पाठवली सेना

ब्राझीलिया : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखलं जाणाऱ्या अ‍ॅमेझॉन जंगलाला भीषण आग लागली आहे. मोठ्या प्रमाणात जंगल जाळून खाक झाल्यानंतर ब्राझील सरकारला जाग आली असून ब्राझीलने आग विझवण्यासाठी आपली सेना पाठवली आहे. ॲमेझॉनच्या घनदाट जंगलाला मागील दोन आठवड्यांपासून आग लागली आहे.

जगात 20 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करणारे अ‍ॅमेझॉन जंगल होरपळत असून अद्याप ही आग नियंत्रणात आलेली नाही. फ्रान्स आणि आयर्लंड यांनी ब्राझीलला बजावले की, जंगलांमध्ये लागलेल्या आगीसाठी काही केले जात नाही तोपर्यंत ते दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलशी व्यापार करार मंजूर करणार नाहीत. त्यांनतर युरोपियन युनियनच्या नेत्यांनी ब्राझीलवर दबाव आणल्यानंतर ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सनारो सीमा, आदिवासी आणि संरक्षित भागात सैन्य पाठविण्याचे आदेश दिले. ॲमेझॉनला लागलेल्या वणव्याने भीषण रुप धारण केल्याने पर्यावरणवादी आणि ब्राझील सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

आगीमुळे निघणारा धूर अंतराळातूनही दिसत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार वायव्येतील या जंगलांमध्ये लागल्याने आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यांपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या ब्राझीलमधील रिओ दी जनेइरोपर्यंत धूर पसरला आहे. ही आग अंतराळातूनही दिसत आहे. अमेझॉन जंगलाला वाचवण्यासाठी नेटिझन्सने सोशल मीडियावर ‘#PrayforAmazonas’ प्रे फॉर अमेझॉन’ हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –