पुण्यात बेकरीला आग, दोन कामगार जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील मोमीनपुरा चांदतारा चौकात असलेल्या बेस्ट बेकरीला आज (बुधवार) सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये बेकरीत काम करणारे दोन कामगार भाजले असून त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन फायरगाड्या, तीन वॉटर ब्राऊझर घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी पाणी मारुन आग आटोक्यात आणली. दरम्यान जवानांना बेकरीत दोन कामगार असल्याची माहिती मिळाली. बेकरीत काम करणारे कामगार घाबरुन बाथरुममध्ये लपून बसले होते.

या आगित दोन कामगार जखमी झाल्याने त्यांना तातडीन रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सहाच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आली. सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सरु असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.