‘भाभीजी घर पे हैं’ फेम सौम्‍या टंडनच्या घराला आग

मुंबई : वृत्तसंस्था – प्रसिद्ध टीव्‍ही मालिका ‘भाभीजी घर पर हैं’ फेम गोरी मेम अर्थात सौम्‍या टंडनच्‍या घरी आग लागली आहे. या घटनेबाबत खुद्द सौम्य टंडनने सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या घरातील किमती वस्तू जळून खाक झाल्याचे दिसत आहे.

हा फोटो शेअर करत तिने ट्विटही केलं आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिलं, या घटनेमुळे तीन गोष्‍टी शिकल्‍या. १-बेडजवळ कधी डास मारणारी कॉईल पेटवून झोपू नये. किंवा झोपण्‍यापूर्वी ती विझवावी. २-लाईटच्‍या प्‍लगमध्‍ये लूज कनेक्‍शन ठेवू नये. ३-आग विझवणारे उपकरण घरात ठेवा आणि त्‍यांचा वापर कसा करावा, हेदेखील शिका.

या घटनेमुळे सौम्या टंडनच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त करत तिच्या तब्‍येतीविषयी विचारपूस करत आहे. या आगीत कुठलीही दुर्घटना झालेली नाही. याची माहिती सौम्याने दिली आहे. सौम्या २००७ मध्ये शाहिद-करीना सोबत ‘जब वी मेट’ चित्रपटात झळकली  होती. याचित्रपटात तीने करीनाची बहीण रूप ची भूमिका साकारली होती पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘भाभीजी घर पर हैं’ च्या गोरी मेम कॅरेक्टरमुळे गेल्‍या महिन्‍यात १४ जानेवारीला सौम्याने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सौम्या टंडनने सोशल मीडियावर आपल्‍या बाळाचा फोटो शेअर केला होता. सौम्याने मुलाचे नाव मिरान असे ठेवले आहे.
You might also like