बोपोडीतील लाकडाच्या वखारीला भीषण आग

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपाजवळील एका लाकडाच्या वखारीला पहाटे  ५ वाजता भीषण आग लागली असून त्यात संपूर्ण वखार जळून खाक झाली आहे. वखारीत लाकडाच्या फळ्या एकावर एक रचून ठेवल्या असल्याने वरुन पाणी मारुन आग विझवली तरी काही वेळाने खालच्या फळ्यामध्ये आग धुमसत असल्याने ती पुन्हा पेट घेत आहे. त्यामुळे आता संपूर्ण वखारीतील लाकडे जे सीबीच्या सहाय्याने बाजूला करुन आग विझविण्याचे काम सुरु असून ते आणखी काही तास चालण्याची शक्यता आहे.

भाजपचा मुस्लिम महिलांच्या मतांवर डोळा 

भाऊ महाराज रोडवर ही वखार असून तिला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. लाकडे असल्याने त्यांनी पटकन पेट घेतला व आग वेगाने भडकत गेली. आगीची माहिती कळताच अग्निशामक दलाचे ४ बंब व २ टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी शटर बंद होते. तेव्हा शटरला दोरी बांधून गाडीच्या सहाय्याने त्यांनी ते शटर तोडली व चारही बाजूने पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला.

वखारीच्या स्लॅबवर लाकडाच्या फळ्या ठेवल्या आहेत. त्यांचे वजन व त्यावर पाणी मारल्याने त्याचे वजन वाढल्याने स्लॅब वाकला आहे. वखारीमध्ये सर्वत्र फळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे बांबु असल्याने आग चांगलीच भडकली होती. सतत पाणी मारुन अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. बांबु बाहेर काढून आग विझविली. मात्र, फळ्या एकावर एक रचून ठेवल्याने त्याची आग पूर्णपणे विझली जात नव्हती. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडली व त्यातून जागा करुन या फळ्या बाजूला करण्याचे काम सुरु केले आहे. जवळपास तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझली असून आता तेथील जागा थंड करण्याचे काम सुरु आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.