‘सेंच्युरी एन्का’ कंपनीत भीषण आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – भोसरी एमआयडीसी येथील सेंच्युरी एन्का कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास ठिणगी पडल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे चार बंब आणि जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. सर्व कामगारांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे.

सेंच्युरी एन्का कंपनीत सकाळी एक ठिणगी पडल्याने आग लागली. टायर आणि कॉटनचा दोरा बनविण्याचे काम या कंपनीत होते. ठिणगी पडल्याने काही वेळातच आगीने रुद्र रूप धारण केले. याबाबत कामगारांनी अग्निशामक आणि पोलिसांना माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीच्या धुराचे लोट हवेत पसरले आहेत. कोणतीही जीवित हानी नाही.

Loading...
You might also like