मुळशीतील मारुंजी रोडवर टायर आणि प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुळशीतील मारूंजी रोडवरील मेमाणे वस्ती परिसरात असलेल्या एका टायर आणि प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या ३ फायरगाड्यांनी ही आग आटोक्यात आणली.

मारूंजी रोडवरील मेमाणे वस्ती येथे कोथरुडमधील एका व्यावसायिकाचे टायर आणि प्लास्टिकचे गोदाम आहे. दरम्यान सायंकाळी ७ ते साडेसातच्या सुमारास या गोदामात आग लागली. त्यानंतर जवळपास मोकळी जागा असल्याने व लोक नसल्याने आग लागल्याचे लवकर समजले नाही. त्यानंतर स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या वाहनांनी तात्काळ धाव घेतली. आत टायर आणि प्लास्टिक असल्याने आगीने भीषण रुप धारण केले. त्यानंतर ३ फायरगाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु आगीत गोदामातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने  या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

 

You might also like