पुण्यातील सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयाच्या ICU मध्ये आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र आग किरकोळ असून, त्या आयसीयूचा वापर नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

पुण्यात गोळीबार मैदान समोर कॅन्टोमेंट येथे सरदार वल्लभाई पटेल रुग्णालय आहे. आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील आयसीयूमध्ये आग लागल्याची घटना घडली. त्यांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यावेळी कॅन्टोमेंट अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग काही क्षणात आटोक्यात आणली.

मात्र खबरदारी म्हणून महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविण्यात आल्या होत्या. परंतु, तोपर्यंत आग विझवण्यात आली होती. दरम्यान रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची माहिती पसरल्याने एकच गोंधळ उडाला होता. पण ही आग किरकोळ होती. या आयसीयूत कोणतीही काम सुरू नसल्याचे सांगण्यात आले.