Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express | शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला भीषण आग, प्रवाशी सुरक्षित

0
493
Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express | Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express passengers safe
file photo

पुणे : Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express | हावडा ते मुंबई या शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला भीषण आग लागली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर ही गाडी आली असताना शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजता हा प्रकार लक्षात आला. या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. (Fire in parcel van of Mumbai-bound Shalimar Express)

हावड्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी शालिमार एक्सप्रेस ही आज सकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर येत असताना तिच्या पार्सल डब्याला आग लागल्याचे लक्षात आले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबविण्यात आली. इंजिननंतरचा डबा पार्सलचा डबा आहे. या डब्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे. डब्यात कपडे असल्याची प्राथमिक माहिती असून आज कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

शालिमान एक्सप्रेस पासून हा आग लागलेला डबा वेगळा काढण्यात आला असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.