पुणे पोलीस आयुक्तालयात आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या टेरेसवर आज (बुधवार) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. या घटनेमुळे आयुक्तालयात एकच खळबळ उडाली असून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या टेरेसवर वेल्डींगचे काम सुरु आहे. वेल्डींग सुरु असताना पडलेल्या ठिणग्यांमुळे या ठिकाणी असलेल्या कचऱ्याने पेट घेतला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.

आगीची घटना समजताच आयुक्तालयात खळबळ उडाली. अग्‍नीशमन दलाचे जवान आणि पोलिस कर्मचारी यांनी आग काही क्षणातच विझवली. आगीमध्ये कुठलेही मोठे नुकसान झालेले नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us