पुण्यात मंडई गणपती परिसरात भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील मंडई गणपतीच्या मागे असलेल्या वाड्यात भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलाच्या ७ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर आग विझविण्याचे काम सुरु आहे.

मंडई परिसर हा प्रचंड वर्दळीचा परिसर आहे. या परिसरातील मंडई गणपतीच्या मागे असलेल्या एका वाड्यामध्ये सकाळी आग लागली. आगीने चांगलेच रौद्र रुप धारण केले आहे. त्यामुळे आगीचा धूर शहरात दूरवरूनसुद्धा दिसतो आहे. मंडईत अगदी एकमेकाला चिकटून घरे आणि दुकाने असल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या ७ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या –

१० हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शन च्या जाळ्यात 

नारायण राणेंच्या पक्षाला मिळाले ‘हे’ अनोखे निवडणूक चिन्ह