Sangli News : मिरज तालुक्यात खळबळ ! सावळवाडी येथील राजारामबापू कारखान्याचे कार्यालय जाळले

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – (Sangli) येथील मिरज (Miraj) तालुक्यातील सावळवाडी मधील राजारामबापू साखर कारखान्याचे ( rajarambapu sugar factory) कार्यालय अज्ञातांनी रविवारी रात्रीच्या वेळेस जाळले आहे. या घटनेमुळे मिरज तालुक्यातील परिसरात खळबळ उमटली आहे. गळीत हंगाम सुरु होऊन आता दीड दोन महिने होत आले असता मात्र, सांगली जिल्ह्यात चार कारखाने वगळता सर्व कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केले आहेत. परिणामी शेतकरी संघटना आणि शेतकरी यांच्यापासून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यातूनच आंदोलकानी एफआरपीसाठीच हे कार्यालय पेटवले असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यालयातील कागदपत्रे टेबल, जळून खाक झाले आहेत. या प्रकारानंतर त्याठिकाणी सकाळी मोठी गर्दी झाली होती.

या दरम्यान रविवारी रात्री माजी खासदार राजू शेट्टी यांची सभा झाली होती. या सभेत एकरकमी एफआरपीबाबत शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. वेळप्रसंगी कोणलाही शिंगावर घेऊ असे शेट्टी यांनी म्हणाले आहे. संघटेनच्या आणि शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत बघू नका. कोणत्याही परिस्थितीत यंदा उसाचे एकरकमी पैसे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेतली होती. या दरम्यान या सभेनंतर रात्री सावळवाडी मध्ये ही घटना घडल्याने परिसरात याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत.