पुरंदरमधील थापेवाडी गावातील गोठ्याला अचानक आग

पुरंदर : पोलीसनामा आँनलाईन –पुरंदर तालुक्यातील गराडे गावाजवळील थापेवाडी येथील अमित परशुराम खवले, प्रविण तुकाराम खवले व बाबूराव किसन खवले यांच्या जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमुळे म्हैस व वासरु भाजले गेले. दोन चाऱ्याच्या गंजी जळाल्या. तसेच गोठ्याचे प्रचंड नुकसान झाले.

आग लागल्यानंतर मोबाईलवरुन ग्रामस्थांनी अग्निशामन दलाशी संपर्क साधला. पुणे महानगरपालिका व सासवड नगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये कुठलीही मनुष्य हानी झाली नाही.

मोठी खुशखबर…आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मोठी मुदतवाढ