कासेवाडीत घरांना भीषण आग

युद्ध पातळीवर आग विझविण्याचे काम सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भवानी कासेवाडी येथील पोलीस चौकीजवळ असलेल्या घरांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर घरांमध्ये आग असल्याने तेथे सिलेंडरचे स्फोट होत असल्याची माहीत समोर येत आहे. चिंचोळ्या रस्त्यामुळे व दोन्ही बाजूला दुचाकी पार्क केलेल्या दुचाकींमुळे गाड्या तेथे जाण्यास अडथळा निर्माण झाला. आग विझवण्याचे काम सुरु आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतील कासेवाडी येथील एका घरात आग लागल्याची माहिती अग्निमन दलाला मिळाली. पावणे आठच्या सुमारास माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. तोवर आगीने रौद्र रुप धारण केले आहे. सिलेंडरचे स्फोट होत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाकडून तातडीने आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. मात्र चिंचोळ्या रस्त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या तेथे दाखल होण्यास अडथळा निर्माण झाला. आग विझविण्याचे काम सुरु आहे. अद्याप तरी कोणी जखमी किंवा मृत झाल्याची माहिती नाही.

…………….सविस्तर वृत्त थोड्याच वेळात