अवधान औद्योगिक वसाहतीत दोन दुकानात आग

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहराजवळील अवधान येथील औद्योगिक वसाहतीतील टी 78 प्लॉट मधील गोडावून वजा दोन दुकानात आग लागुन लाखो रुपयांचे साहित्य आगीत जळून खाक झाले.

सविस्तर माहिती की, अवधान औद्योगिक वसाहत मधील टी 78 प्लॉट मधील गोडावूनमध्ये जिगने चावरा यांचे मालकीचे युवा मँटरसे व बाजुलाच भिमराव वरवटे यांचे ट्रान्सपोर्टेचे दुकान आहे. पहाटे साडे तीन ते चार वाजेच्या दरम्यान दुकानात अचानपणे आग लागली. आग कशामुळे लागली नेमके कारण समजू शकले नाही. परंतू दोन्ही दुकानातील माल आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने आगीत साहित्य जळून खाक झाले आहे. यात दोन्ही दुकानाचे मिळून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच मनपा अग्निशामक बंब, मालेगाव येथील मनपा अग्निशामक बंबाने मिळुन दहा ते बारा फेऱ्या मारत पाणी मारा केला. चार तासांत आग अटोक्यात आणली. यात सुदैवाने कोणतीच जिवीत हानी झाली नाही. या प्रकरणी सकाळी उशीरा पर्यत मोहाडी पोलीस ठाण्यात अग्निउपद्रव 3/7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like