US नेव्हीचं विमानवाहक जहाज ‘बोनहोम्मे रिचर्ड’ला लागली ‘आग’, 21 जण जखमी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील नौदलाच्या सॅन डिएगो तळावर तैनात असलेल्या यूएसएस बोनहोम्मे रिचर्डला आग लागल्याने किमान 21 जण जखमी झाले आहेत. नेव्ही ग्राउंड फोर्सने रविवारी ट्विट करत म्हटले आहे की, ‘एका स्थानिक रुग्णालयात सतरा सैनिक आणि चार नागरिकांवर उपचार सुरू आहेत. ते सर्व धोक्याच्या बाहेर आहेत. जहाजावरील प्रत्येकाशी संपर्क साधला गेला आणि अग्निशमन दलाला आग विझविण्यात मदत करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.’

यापूर्वी नौदलाच्या अहवालात असे म्हटले होते की किरकोळ जखमी झालेल्या 18 सैनिकांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. रविवारी स्थानिक वेळेनुसार साडेआठच्या सुमारास ही आग लागली. नौदलानुसार सॅन डिएगो तळावर तैनात असलेल्या इतर दोन जहाजांना युएसएस फिट्ज गेराल्ड आणि यूएसएस रसेल यांना आगीपासून दूर नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यूएसएस बोनहोम्मे रिचर्डवर एकूण 160 नौदलाचे सैनिक उपस्थित होते. नियमित देखभाल दरम्यान या जहाजाला आग लागली. जहाजातील चालक दलाची संख्या सुमारे 1,000 आहे. नौदलाने सांगितले की, रविवारी जहाजावरील सर्व खलाशी काढण्यात आले आहेत. यूएसएस बोनहोम्मेला लागलेल्या आगीचे कारण शोधले जात आहे. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार जहाजावर स्फोट झाला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like