बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

आज प्रभात रस्ता येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचारी प्रशिक्षण महाविद्यालयात पुणे अग्निशमन दलाच्या वतीने विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. सुनिल गिलबिले यांनी अागीविषयक माहिती व प्रात्यक्षिक करुन दाखविले.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75319e6e-901c-11e8-a220-19b926559199′]

या महाविद्यालयात संपुर्ण भारतातील बँकेचे सुमारे पस्तीस कर्मचारी विविध प्रशिक्षणाकरिता पुण्यात दाखल झाले आहेत. यामधील एक अत्यंत आवश्यक भाग म्हणून अग्निशमन अधिकारी श्री. सुनिल गिलबिले यांनी आगीपासून बचाव अथवा बँकेमधे होणाऱ्या आगीच्या घटना, एटीएम मधे लागणाऱ्या आगी तसेच दैनदिन जीवनातील आगीपासून स्वत:चा तसेच बँकेच्या मालमत्तेचा बचाव कसा होईल.

या सर्व बाबतीत सविस्तर सांगत बँकेच्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांकडून अग्निसुरक्षे विषयी प्रात्यक्षिक ही करवून घेण्यात आले. शेवटी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांचे आभार मानण्यात आले.