सिरममधील आगीच्या घटनेची राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत शहानिशा करणार : उपमुख्यमंत्री पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीत लागलेल्या आगीत गुरुवारी (दि. 21) पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती जाणून घेतली. कुणी काही आरोप केले तरी राज्यातील जनतेने अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही. या घटनेची राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत शहानिशा केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सिरममध्ये गुरुवारी दुपारी लागलेली आग आटोक्यात आली आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहे. मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही. उद्या पाहणी होईल व कारण कळेल व किती जीवितहानी हे स्पष्टपणे सांगता येणे शक्य आहे. तसेच आग लागल्यानंतर सुरवातीच्या काळात या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही नसल्याचे सांगितले जात होते. मात्र इमारतीमध्ये काम सुरु असल्याने 5 कामगारांचे पूर्णपणे जळालेले मृतदेह मिळाले आहे. यात हे पाचच मृत्यू असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अग्निशामक दलाने भीषण आगीवर मिळवलेले नियंत्रण हे कौतुकास्पद असल्याचे म्हणाले.

उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घटनास्थळाला भेट देणार आहे. मात्र ज्या ठिकाणी कोरोना लसची निर्मिती होत आहे. तिथे काहीही नुकसान झालेले नाही. कोविशील्ड लस सुरक्षित आहे. इतर लस बनवण्यासाठी प्रयत्न केल जात होते त्या ठिकाणी ही आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर आले होते. त्याच इमारतीच्या वरच्या मजल्याला आग लागली आहे. फायर ऑडिट व इतर टीम आग लागलेल्या ठिकाणी भेट देणार असून माहिती घेणार आहेत, असे पवार म्हणाले.