लोकलच्या पेंटाग्राफला आग : पश्चिम रेल्वे विस्कळीत

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – जलद मार्गावरील ओव्हरहेड वायरने  पेट घेतल्याने खार रेल्वे स्टेशनजवळ लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली. याच आगीमुळे बोरीवलीच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे ते खार रेल्वे स्थानकादरम्यान पादचारी पुलावरुन कापडाचा एक तुकडा जलद मार्गावरील ओव्हरहेड वायरवर पडला. यामुळे ओव्हरहेड वायरने पेट घेतला. ही आग जलद मार्गावरुन जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफपर्यंत पोहोचली.
आता जलद मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असून लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. नोकरदारांच्या कामावरुन घरी जाण्याच्यावेळी ही घटना घडल्यामुळे लोकल प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आगीचे लोळ डब्ब्यांपर्यंत पोहोचल्यानंतर लगेचच लोकल थांबवून प्रवाशांना खाली उतरवण्यात आले होते.
आगीची घटना घडल्यानंतर जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली होती. काहीवेळासाठी विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला होता. पश्चिम रेल्वे प्रशासनाने झटपट हालचाल करत जलद मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.
विजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर लाँच, वेग असणार 210 किमीचा
वृत्तसंस्था – कार वापरणाऱ्यांसाठी आणि कार वापरण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी आता आनंदची बातमी आहे. पुढील 12 वर्षांत भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे लक्ष्य ठेवणाऱ्या सरकारसाठीदेखील ही चांगली बाब आहे.
इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठी कंपन्यांनी कंबर कसली आहे. मात्र, लोकांनी या कार महागड्या असणार असल्याने धास्ती घेतली आहे. यामुळे अल्टो आणि वॅगनआर सारखी खिशाला परवडणारी कार जर विजेवर चालणारी असेल तर त्यांना दिलासा मिळणार आहे. सर्वाधिक खपाच्या दोन कार अल्टो आणि वॅगन आर या आता विजेवर चालणार आहेत. मात्र, या कार मारुती सुझुकी नाही तर एक स्टार्टअप कंपनी विकणार आहे. धक्का बसला ना, खरे आहे. या दोन्ही कार पेट्रोलवर चालणाऱ्या कार आहेत. तेलंगानाच्या E-trio Automobiles या स्टार्टअप कंपनीने मारुतीची आणि एआरएआयची परवानगी घेऊन दोन्ही कार विजेवर चालण्यासाठी तयार केल्या आहेत. यामुळे सध्याच्या कारचे काय होणार हा प्रश्नही काहीसा निकाली निघाला आहे. E-trio ही ARAI ची मान्यता मिळालेला पहिली कंपनी आहे.
E-trio ही कंपनी सध्याच्या IC इंजिन वाल्या कारवर काम करत आहे. यामुळे महागड्या इलेक्ट्रीक कार घेण्यापेक्षा वाहनमालक त्यांच्याकडील वापरातील कारमध्ये आवश्यक बदल करून विजेवर चालवू शकणार आहेत. सध्या ही कंपनी Alto आणि WagonR या कारला विजेवर चालविण्याची सेवा देत आहे. या कारची दोन वर्षांपासून चाचणी सुरु आहे. E-trio ने सांगितले की या वाहनांना गिअरची गरज राहत नाही. रेट्रोफिट किट बसविल्यानंतर या कार 150 किमीच्या वेगाने धावतात. चाचणीवेळी या कारनी तब्बल 210 किमीचा वेग पकडला होता.
अल्टो आणि वॅगन आरवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कंपनी अन्य कंपन्यांच्या कारना विजेवर चालविण्यासाठी परवानगीची वाट पाहत आहे. या कंपनीची सध्या दर महिन्याला 1000 कार रेट्रोफिट करण्याची क्षमता आहे. पुढील वर्षी हा आकडा 5000 करण्यात येणार आहे.