Video : पठ्ठ्याला मानलं राव ! भीषण आगीत ‘अशा’ पद्धतीने ‘झोपून राहिला’ आणि वाचवले स्वतःचे प्राण

वृत्तसंस्था – नुकतेच सुरत येथे घडलेल्या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला. आता त्यानंतर अशी एक आगीची घटना समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीने आश्चर्यकारक रित्या आपले प्राण वाचवले आहेत. या घटनेच्या व्हिडीओने सोशल माडियावर धुमाकूळ घातला आहे. खरंतर हा व्हिडीओ रोम मधला आहे.

काय आहे व्हिडीओ ?
अपार्टमेंटमध्ये आग लागल्यानंतर त्या व्यक्तीने खिडकीतुन उडी मारली आणि तो खिडकी खालच्या कठड्यावर झोपी गेला. इमारत उंच असल्यामुळे उडी मारणे किंवा इमरतीवरून उतरणे शक्य नव्हते. तो जिथे पडून राहिला होता त्याच्या समोरच आगीच्या ज्वाला भडकत होत्या. विद्युत दिवे देखील जळत होते. काहीच वेळाने आग आपल्या जवळ येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या अंगावरील शर्ट देखील काढून टाकला. आता आगीचं भडका त्याच्या आणखी जवळ येत होता. मात्र त्याचे सुदैव असे की तोपर्यंत तेथे अग्निशामक दलाचे कर्मचारी आले आणि त्यांनी सर्वप्रथम त्याच्या समोरची आग विझवली आणि या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले.

तरुणावर कौतुकाचा वर्षाव
ही सगळी घटना इमारतीखाली उभे असलेले लोक पाहत होते. या तरुणाचे प्राण वाचवताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. या व्हिडिओमधील या तरुणाचे मात्र त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे. रोम मध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका ऑस्ट्रेलियन पर्यटकाने हा व्हिडीओ चित्रित केला आहे. ही आग शॉर्ट सरकीटमुळे लागल्याची सांगण्यात येत आहे.

Loading...
You might also like