आगीत होरपळून अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – कारखान्याला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात अग्निशामक दलातील एका जवानाचा गुदमरून मृत्यू झाला, तर इतर जवान या घटनेत बाधित झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे.

बी. डी. देशमुख (वय 32 ) असे गुमदरून मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये एका रासायनिक प्रक्रिया करणा-या कारखान्याला भीषण आग लागली होती. येथील आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात असताना देशमुख यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य कर्मचारीदेखील बाधित झाले आहेत.