Pune News | ‘ड्युटी’ संपल्यावरही ‘ड्युटी’ सुरुच ! अग्निशमन दलाच्या जवानाने लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणीची केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Firefighters | पोलीस, डॉक्टर हे २४ तास ड्युटीवर असतात, असे म्हटले जाते. कधी कोणाला कशी मदत लागेल हे सांगता येत नसते. अशा वेळी पोलीस, डॉक्टर धावून जातात. त्यामध्ये आता अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश करावा लागेल. ड्युटी संपवून घरी असलेल्या अग्निशमन  Firefighters जवानाने लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणीची सुटका केली. ही घटना मांजरी बुद्रुक येथील ऑक्सिजन वेलरी या ७ मजली इमारतीत गुरुवारी सायंकाळी घडली. Firefighters rescue a young woman trapped in an elevator

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

स्वप्निल टुले असे या अग्निशमन दलाच्या जवानाचे नाव आहे. स्वप्निल टुले हे ड्युटी संपवून घरी गेले होते. मांजरी बुद्रुक येथील ऑक्सिजन वेलरी जवळच ते रहतात. ते सायंकाळी एका किराणा दुकानात सामान घेण्यासाठी गेले होते. ऑक्सिजन वेलरी या इमारतीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यामध्ये काही तांत्रिक कारणामुळे लिफ्ट अडकून बंद पडली होती. तेथील वॉचमन आणि इतर रहिवाशांकडून आरडाओरडा सुरु झाला. टुले यांना ही घटना समजताच ते मदतीला धावून गेले.

आपण अग्निशमन दलाचे जवान असल्याचे सांगून त्यांनी प्रथम त्या तरुणीला धीर दिला. त्यानंतर त्यांनी लिफ्ट रुमच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवानुसार त्यांनी लिफ्ट कार्यरत केली. लिफ्ट कार्यरत होताच त्यांनी येऊन त्या लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणीची सुखरुप सुटका केली. जवान टुले यांनी दहाच मिनिटात केलेल्या या कामगिरीचे त्या तरुणीने व रहिवाशांनी आभार मानले़ व अग्निशमन दलाचे कौतुक केले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Firefighters rescue a young woman trapped in an elevator

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’